मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यांतच कोसळल्याची घटना घडली , यावरून राजकारण चांगलेच तापले आहे . या घटनेने शिवभक्तांची मन दुखावली गेली असून विरोधकांकडून सरकार वर जोरदार टीका जेली जात आहे . दरम्यान , शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. शिवरायांची माफी मागतिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. यानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे.
आज या कार्यक्रमाची चर्चा करत असताना, मी आपल्या भावना व्यक्त करू इच्छितो, माझी पंतप्रधान पदाच्या उमेदवारी निवड झाली होती, त्यावेळी मी रायगडावर येऊन शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळ येऊन बसलो होतो. मागच्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडलं, माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज नमन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
यानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे. मालवणच्या घटनेचं गांभीर्य भाजपला कळायला लागलं, पण मोदींनी किंतू परंतू लावला. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना मोदींना करायची आहे का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे.
भरीव पुतळा उभारायला 3 वर्ष लागतात पण 6 महिन्यांमध्ये पुतळा कसा केला गेला? पंतप्रधानांना इव्हेंट करायचा होता, त्यामुळे ही घटना घडली. नुसती माफी मागून चालणार नाही. जबाबदारी फिक्स झाली पाहिजे. नेव्हीची जबाबदारी असेल किंवा बांधकाम विभागाची जबाबदारी असेल, तर मंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे. पंतप्रधानांनी जबाबदारी निश्चित केली पाहिजे. छत्रपतींच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करता, पंतप्रधानांनी राज्यातून जाण्याआधी शासन झालं पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.