मालवणमधील  शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी  'या' दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी 'या' दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
img
दैनिक भ्रमर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित जबाबदार दोन व्यक्तींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे. मेसर्स अर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंटचे चेतन पाटील यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आलेत. बांधकाम विभागानं ही कारवाई केलीय. तर या प्रकरणात PWD ने नौदलाकडे  बोट दाखवलंय. संभाव्य धोक्यासंदर्भात नौदलाला आधीच सुचना केल्याचं बांधकाम विभागाने स्पष्ट केलंय.. 

4 डिसेंबर 2023 ला नौसेना दिनानिमित्त मालवण तालुक्यातील राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार आपटे यांच्याकडून डागडुजी करण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत पुतळ्याचं जॉईट करण्यासाठी आपण नट बोल्टचा वापर केला होता. त्या नट बोल्टला आता पावसामुळे आणि खाऱ्या वाऱ्यामुळे गंज चढलाय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विद्रूप दिसत आहे.  तसंच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वर्षभर सुरू असते. त्यामुळे ग्रामस्थ आणि राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीय. संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणेबाबत तात्काळ कळवावे. असं पत्र 20 ऑगस्ट 2024 रोजी नौसेनेला लिहिल्याचं पीडब्लूडीकडून स्पष्ट करण्यात आलंय.

हा पुतळा भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या दुर्घटनेची भारतीय नौदलाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच दुर्घटनेच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. तसेच हा पुतळा तातडीने पुन्हा उभारण्याच्या दृष्टीने नौदलाकडून पावलं उचलण्यात येत आहेत.

दरम्यान, शिवरायांचा पुतळा कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे. या दुर्घटनेचं विरोधकांनी भांडवल करू नये, असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आवाहन केलं आहे. तसेच राजकोट येथे १०० फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने उभारला जाईल, असं आश्वासन दीपक केसकर यांनी दिलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group