लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला?
लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला?
img
दैनिक भ्रमर

लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गट 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. 

महाविकास आघाडीचा 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

जागावाटपाच्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, ठाकरे गटाचे खा. संजय राऊत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उपस्थित होते असे समजते.

वंचितसाठी 4 जागा सोडण्याचा विचार महाविकास आघाडी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group