संपूर्ण जगात कोरोनाने हैदोस घातला होता. भारतातही कोरोनाचा वाढता कहर बघता लॉकडाऊन ही लावण्यात आले होते. कोरोनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते आणि याच दरम्यान चुकीची माहिती सांगून चुकीचे उपचार करून अनेक डॉक्टरांनी अवयवांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप अनेकांकडून करण्यात येत होता. आता याच कोरोना काळातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

खोटे रिपोर्ट तयार करून रुग्णांवर चुकीचे उपचार करणे. यामुळे रुग्णाचा मृत झाल्यानंतर रुग्णांचे अवयव तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये घडल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयाने केला आहे. या प्रकरणी शहरातील नामांकित पाच डॉक्टरांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या डॉक्टरांना अद्याप अटक करण्यात आली नसून या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
कोरोना काळात घसा दुखत असल्याचा इलाज करण्यासाठी गेलेल्या रुग्णाचा कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्टबनविला होता. यानंतर सदर रुग्णावर पुढे चुकीचे उपचार दिले. यात रुग्णाचा मृत्यू झाला. तर यानंतर मृतदेह मुलाला न देता जिल्हा रुग्णालय किंवा महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी डॉक्टरांकडून सांगण्यात आले. यात अवयवांची तस्करीसाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली; अशा प्रकारचे गंभीर गुन्हे शहरातील पाच डॉक्टरांवर दाखल झाले आहेत.
अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात रुग्णाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पाच डॉक्टरांनी विरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत मात्र गुन्हे दाखल होऊ नये डॉक्टर अद्याप अटक झाले नसल्यामुळे अशा डॉक्टरांवर त्वरित कारवाई करून त्यांच्या रुग्णालयावर बॉम्बे नर्सिंग होम कायदा अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केली आहे.