अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू, तर....
अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू, तर....
img
Dipali Ghadwaje
ऊसाने भरलेला ट्रॅक्टरची बाईकला धडक लागल्याने मोठा अपघात झाल्याची घटना मध्य प्रदेशातील जबळपूर येथे घडली आहे. या अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तसेच या अपघातात पत्नी गंभीर झाल्याची माहिती आहे.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी रात्री उशिरा शहापूर पाटणा रोडवर घडला आहे. धर्मेंद्र कुश्वाहा (वय वर्ष 35) असं अपघातात मृत झालेल्या पतीचे नाव आहे. त्याचा मुलगा रिसाव (वय वर्ष  १०) याचांही अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर धर्मेंद्र यांची पत्नी रोशनी ( वय वर्ष 32) अपघातात जखमी झाले आहे. रोशनीला शहापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

एक अज्ञात ट्रक्टर ऊस घेऊन जात होता, त्यावेळी एक कुटुंबातील तीन सदस्य बाईकवरून जात होते. बाली येथील गुनसोर गावातील हनुमान मंदिराच्या परिसरात रेवा साखर कारखान्याच्या  जवळ हा अपघात घडला.  अपघाताची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आले. पोलिस अपघाताची चौकशी करत आहे. 
   
इतर बातम्या
Join Whatsapp Group