भारतानं पाकिस्तानचे ''ते'' दावे फेटाळले
भारतानं पाकिस्तानचे ''ते'' दावे फेटाळले
img
दैनिक भ्रमर
पहलगाममध्ये झालेल्या दहशदतवादी  हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याचा निषेध आणि बदला भारतानेघेतला असून भारताने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून चांगलाच धडा शिकवला असून पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. 

दरम्यान,  ऑपरेश सिंदूरच्या यशानंतर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेले दावे भारतानं फेटाळून लावले आहेत. तसेच पाकिस्तानची मागणी देखील फेटाळून लावली आहे.
  
 पाकिस्तानचा दावा काय ?   

भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये आमचे 26 नागरिक मारले गेले आणि 46 जण जखमी झाले आहेत, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता, तसेच आमच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याचं देखील पाकिस्तानने म्हटलं होतं. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संयुक्त चौकशी करा अशी मागणी देखील पाकिस्तानने केली होती, मात्र ही मागणी आणि दावे भारतानं फेटाळून लावले आहेत.

दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची संयुक्त चौकशी व्हावी अशी मागणी पाकिस्तानने केली होती, मात्र ती मागणी देखील भारतानं फेटाळून लावली आहे, 26/11 आणि पठाण कोट हल्ल्यानंतर सर्व पुरावे देऊन देखील पाकिस्तानचं अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group