अमेरिकेमधील साधारण 32 ते 35 किलोमीटरचे कॅटलिना चॅनल दिव्या महाजन या 15 वर्षीय नाशिकच्या मुलीने केवळ 15 तास 23 मिनिटांमध्ये पोहून पूर्ण केले. कॅटलिना चॅनल यशस्वीरित्या पोहून पूर्ण करणारी भारतातील ती सर्वात लहान (यंगेस्ट स्विमर) झाली आहे. कॅटलिना यासमुद्र बेटापासून रात्री 11 वाजता स्विमिंगला सुरुवात करून रात्रभर स्विमिंग करून दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास ती कॅलिफोर्नियातील समुद्रकिनारी पोहोचली.
तिच्या समोरील आव्हाने अशा प्रकारे होती : पंधरा तास न थांबता स्विमिंग करणे, समुद्राच्या पाण्याचं तापमान जवळपास वीस डिग्री सेल्सिअस एवढे थंड होते आणि समुद्रांच्या लाटा यांना पार करत तिने ही मोहीम पूर्ण केली. तिची ही मोहीम सेवन ओशन (Seven Ocean) म्हणजे जगातील सात समुद्रातील सर्वात खडतर 7 खाडी स्विमिंग करणे हे तिचे ध्येय आहे.
त्यातील कॅटलिना हे तिचे पहिले चॅनेल होते. या मोहिमेचे नाव सप्तसागर असे आहे आणि महाजन बंधू फाउंडेशनच्या अंतर्गत ही सप्तसागर मोहीम तिने हाती घेतली आहे. या अंतर्गत ती भारतातील युवतींना उंच भरारी घेण्यासाठी प्रेरणा देऊ इच्छिते. तिचे आणि महाजन बंधू फाउंडेशन चे उद्दिष्ट आहे 'Empowering Girl Child Through Sports & Education'. दिव्या ही हितेंद्र महाजन यांची कन्या असून डॉ. महेंद्र महाजन यांची पुतणी आहे.