युजवेंद्र चहलला धनश्रीने सुनावलं, म्हणाली अरे व्हाट्सॲप तर...
युजवेंद्र चहलला धनश्रीने सुनावलं, म्हणाली अरे व्हाट्सॲप तर...
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : अभिनेते तसेच क्रिकेटपटू यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. यांच्या लग्नाची जशी जोरदार चर्चा होते तशीच जर घटस्फोट झाला तर त्याचीही चर्चा होते. त्यात क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याचा घटस्फोट या ना त्या कारणावरून चर्चेत राहिला. घटस्फोटाच्या सुनावणीनंतर युजवेंद्र चहलच्या टी-शर्टमुळे तर धनश्री वर्मा टीकेची धनी बनली. 

कोर्टातील घटस्फोटाच्या सुनावणीनंतर युजवेंद्र चहलच्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यावर आता अखेर धनश्रीने मौन सोडलं आहे. कोर्टात घटस्फोटावर शिक्कामोर्तब होताच, काय घडलं, याविषयीही ती मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटाच्या शेवटच्या सुनावणीदरम्यान युजवेंद्रच्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ‘बी युअर ओन शुगर डॅडी अशा मजकूराचा टी-शर्ट त्याने परिधान केला होता. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या वेळी, चहल कोर्टात जाताना याच वाक्याचा उल्लेख असलेला टी-शर्ट घालून गेला होता. त्यामुळे, या वाक्याचा अर्थ काय आणि चहलने तो का घातला, याबद्दल बरीच चर्चा झाली. 

हे ही वाचा... 
'दोन शून्यां’ची बेरीज शून्यच..., बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे बंधुंना भाजपचा चिमटा

काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये चहलने खुलासा केला होता की, हा जगाला आणि पूर्व पत्नीला संदेश देण्याचा एक मार्ग होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धनश्रीने त्यावर अखेर मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत धनश्री तिच्या घटस्फोटाबद्दल आणि कोर्टातील त्या अखेरच्या सुनावणीबद्दल म्हणाली, “मला अजूनही आठवतंय की मी तिथे उभी होते आणि निकाल लागणार होता. मानसिकदृष्ट्या आमची तयारी होती, तरीही मी खूप भावूक झाली होती. मी तिथे सर्वांसमोर अक्षरश: रडत होती. त्यावेळी मला काय वाटत होतं, ते मी व्यक्तही करू शकत नव्हती. मला फक्त आठवतंय की मी रडतच होती.”

कोर्ट बाहेर चहलच्या टी-शर्टचा स्टंट झाला. मला ही गोष्ट माहीत होती की त्यासाठी लोक मलाच दोष देतील. अरे भावा, व्हॉट्स अॅप करायचं होतं. टी-शर्ट घालायची काय गरज होती”, असा उपरोधिक सवाल तिने चहलला केला. “त्याक्षणी तिथे बसून मला जाणवलं होतं की, हे पूर्णपणे संपलंय, आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही”, मग मी विचार केला की, जाऊ दे, संपवूया हे सगळं. त्या टी-शर्टच्या स्टंटने आणि त्या क्षणांनी मला हसण्याची आणि तिथून पुढे जाण्याची प्रेरणा दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group