धक्कादायक ! पती-पत्नीच्या वादातून पत्नीची आठव्या मजल्याहून उडी, नेमकं काय घडलं ?
धक्कादायक ! पती-पत्नीच्या वादातून पत्नीची आठव्या मजल्याहून उडी, नेमकं काय घडलं ?
img
दैनिक भ्रमर


पती-पत्नीच्या वादातून क धक्कादायक घटना घडली असल्याची  भयंकर घटना समोर आली आहे. पुण्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.  घडली असून यात एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणानंतर इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, ती बाल्कनीतील रेलिंगला लटकली. यानंतर पतीने तिचा हात धरून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही .

मिळालेल्या माहितीनुसार , ,महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणानंतर इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. प्रतिभा शंकर असं आत्महत्या करण्याऱ्या महिलेचं नाव आहे.मिळालेल्या माहितनुसार , उडी मारल्यावर आठव्या मजल्यावरून खाली पडून तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सोसायटीमधील दुसऱ्या एका रहिवाशाने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केली. व्हिडिओमध्ये दिसतं की, ती महिला काही वेळ बाल्कनीच्या रेलिंगला धरून होती आणि जवळचे लोक मदतीसाठी ओरडत होते. तिच्या पतीने महिलेचा हात पकडून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पाहता पाहता तिचा हात निसटला आणि ती थेट जमिनीवर पडली.घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोलीस आता वादाचे कारण आणि त्या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले होते का, याचा तपास करत आहेत. .


इतर बातम्या
Join Whatsapp Group