सध्याच्या धावपळीच्या जगात ताणतणाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्याचे आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यात आरोग्यासाठी महत्त्वाची असलेली झोप देखील पूर्ण होत नाही किंवा कधी कधी ती लागतही नाही. त्यात सतत मोबाईल, सोशल मीडियाचा जास्त वापर, कामाचे दडपण आणि व्यायामाचा अभाव हे सर्व झोपेवर थेट परिणाम करतात. हीच झोप पूर्ण करण्यासाठी काही उपाय आहे हे तुम्हाला उपयोगात पडू शकतील. चला तर हे उपाय जाणून घेऊया.
१) मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप झोपेच्या अगोदर टाळा. - मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यांचा वापर झोपेच्या अगोदर टाळावा. या उपकरणांपासून येणारा प्रकाश शरीरात मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन कमी करतो, ज्यामुळे झोपेचा चक्र बिघडते. झोपेच्या एक ते दोन तास आधी सर्व उपकरणांपासून दूर राहणे उपयुक्त ठरते. ज्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.
२) गरम पाण्याचे शॉवर- झोपण्याआधी गरम पाण्याने आंघोळ केल्यास शरीराचे स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मानसिक ताणदेखील कमी होतो. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
३) झोपेची वेळ ठरवा - झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ ही ठरलेली असावी. यामुळे शरीराचा बायोलॉजिकल क्लॉक योग्य प्रकारे काम करतो. रात्री उशीरपर्यंत जागरणे आणि सकाळी उशिरा उठणे, दोन्ही शरीराच्या नैसर्गिक लयाला विस्कटतात आणि झोपेची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे रात्री झोप लवकर लागत नाही. आणि याचा परिणाम मग झोपेवर होतो.
४) हलके अन्न घ्या- रात्री झोपण्याआधी जड किंवा तिखट अन्न खाल्ले तर पचनक्रिया मंदावते आणि शरीर शांत होत नाही. झोपण्यापूर्वी दूध, गोड कढी किंवा हलकी फळं खाणे अधिक फायदेशीर ठरते. जेणेकरून तुम्हाला झोपेचा आनंद घेता येईल.
५) योग आणि प्राणायाम - योग आणि प्राणायाम मन शांत करण्याचे उत्तम साधन आहे. विशेषत हा अनुलोम-विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम हे झोपेपूर्वी करणे. याने मन शांत करून मानसिक तणाव दूर होतो आणि हे नियमित केल्यास झोप जलद आणि शांत होते.