उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार चुरशीची ! इंडिया आघाडीकडून उमेदवार जाहीर
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार चुरशीची ! इंडिया आघाडीकडून उमेदवार जाहीर
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अलीकडेच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली आहे. यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल असं बोललं जात होतं. मात्र आता इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांच्याशी होईल. ७९ वर्षीय रेड्डी हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि गोव्याचे पहिले लोकायुक्त होते. 

कोण आहेत बी सुदर्शन रेड्डी ? 
बी. सुदर्शन रेड्डी हे मुळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. त्यांनी B.A., LL.B. पदवीचं शिक्षण घेतलं. २७ डिसेंबर १९७१ रोजी हैदराबाद येथे आंध्र प्रदेश बार कौन्सिलमध्ये त्यांची वकिल म्हणून नोंद झाली. त्यांनी सुरुवातीला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात Writ आणि दिवाणी खटले हाताळले. 1988 ते 1990 या कालावधीत ते उच्च न्यायालयात शासकीय वकील म्हणून कार्यरत होते.

पाऊस जीवावर उठला ! राज्यात पावसाचे ७ बळी; मराठवाड्यात ११ जण बेपत्ता

२ मे १९९५ रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ५ डिसेंबर २००५ रोजी त्यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. १२ जानेवारी २००७ रोजी ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. ८ जुलै २०११ रोजी त्यांनी निवृत्ती घेतली. गोव्याचे पहिले लोकायुक्त होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group