आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १ रुपया, सरकारनं दिली अत्यंत महत्वाची अपडेट
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १ रुपया, सरकारनं दिली अत्यंत महत्वाची अपडेट
img
Dipali Ghadwaje
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठी गर्दी करत आहेत. पण अशामध्ये या योजनेबाबत मोठी अपेडट समोर आली आहे.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे १ कोटीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज प्राप्त झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात १ रुपया जमा होणार आहे. हे असं का केलं जाणार आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण याबाबत सरकारनेच महत्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातील १ कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केला आहे. महिला व बालविकास विभागाकडे हे सर्व अर्ज आले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात १ रुपया जमा करण्यात येणार आहे. हा १ रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. तेव्हा यासंदर्भात माता-भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला आणि गैरसमजाला बळी पडू नये, असे आवाहन देखील सरकारने केले आहे. 

हेही वाचा >>>>> महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, आणि.....

लाडकी बहीण योजनेकरिता पुणे जिल्ह्यातून ९ लाख १५ हजार ९३९ महिलांनी अर्ज सादर केले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया जिल्हा महिला व बालविकास विभागाने सुरू केली आहे. सर्व तालुक्यांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. सर्वाधिक ७१ हजार अर्ज पुणे शहरातून दाखल झाले आहेत. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत आधी १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. पण या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सरकारने मुदत दोन महिने ठेवण्याचे ठरवले. आता ३१ ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून १५०० रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group