नाशिकच्या 'तेजस'ची पाकिस्तानलाही धडकी, कारण...
नाशिकच्या 'तेजस'ची पाकिस्तानलाही धडकी, कारण...
img
वैष्णवी सांगळे
‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देणारी ऐतिहासिक घटना नाशिककरांनी अनुभवली आहे. देशात बनवलेलं पहिले तेजस एमके 1A (Tejas MK1A ) लढाऊ विमान नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या ओझर युनिटमधून आकाशात झेपावलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक कामगिरी पार पडली.


हे अत्याधुनिक लढाऊ विमान भारतीय वायुसेनेत अधिकृतपणे दाखल झालं असून, त्यासोबतच HAL च्या नवीन उत्पादन लाईनचे उद्घाटनही यावेळी करण्यात आलं. बंगळुरूनंतरची ही दुसरी उत्पादन सुविधा असून, स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण घडी ठरली आहे.

स्वदेशी बनावटीचं तेजस एमके 1A लढाऊ विमान आहे .या लढाऊ विमानाची वैशिष्ट्य काय आहेत ? जाणून घ्या 

पूर्ण भारतीय बनावटीचं सर्वात हलकं लढाऊ विमान

ताशी 2 हजार किमी वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता

50 हजार फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता

AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणं आणि ट्रॅक करणं शक्य

CIT प्रणालीमुळे “मित्र की शत्रू” अशी लक्ष्य ओळख त्वरित शक्य

SDR रेडिओमुळे सुरक्षित व सॅटेलाइटद्वारे संवाद साधण्याची सुविधा

डिजिटल मॅप जनरेटरमुळे परिसर आणि उंचीची अचूक माहिती मिळते

EW Suite प्रणाली शत्रूच्या रडारला जॅम करून फसवण्याची क्षमता 

SMFD स्क्रीनवर मिशन डेटा, नकाशे आणि अलर्टची थेट माहिती मिळते.

डेल्टा विंग डिझाइनमुळे उच्च वेग आणि चपळ उड्डाण क्षमता

तेजससारख्या स्वदेशी लढाऊ विमानामुळे भारताची संरक्षण क्षमता अधिक मजबुत होणार आहे. आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण दलाच्या माध्यमातून देशानं टाकलेलं हे मोठं पाऊल आहे. लवकरच भारत 100 टक्के आत्मनिर्भर होणार, अशी भूमिकाही केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलीय.

तेजस MK1-A लढाऊ विमानामुळे भारतीय वायुसेनेला नवं बळ मिळणार आहे. तसचं देशाचा स्वदेशी तंत्रज्ञानावरचा विश्वास तेजस आणखी बळकट करेल आणि आगामी काळात हेच स्वदेशी लढाऊ विमान राष्ट्राच्या संरक्षणाचे प्रतीक मानलं जाईल., हे निश्चित...
Nashik | HAL |
इतर बातम्या
Join Whatsapp Group