गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्याची उभी पिके डोळ्यासमोर उद्वस्त झाली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय . सरकारची मदत मिळावी या आशेने तो सध्या डोळे लावून आहे. अशातच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचं विधान करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवारफेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकारांशी त्यांनी म्हटलं आहे की , राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे. राज्यातील जून, जुलै महिन्यातील नुकसानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाल्याचं ते यावेळी म्हणाले. दरम्यान, राज्यात सध्या युरियाच्या तुटवड्यासंदर्भात केंद्राशी बोलणे सुरू आहे. यासंदर्भात लवकरच शेतकऱ्यांना गुड न्यूज देणार असल्याचं कृषिमंत्री भरणे म्हणालेत.