का केली?  नवऱ्याने बायकोची कुऱ्हाडीने हत्या !
का केली? नवऱ्याने बायकोची कुऱ्हाडीने हत्या !
img
Jayshri Rajesh
रागाच्या भरात माणूस काय करेल हे सांगता येत नाही. अनेकदा राग अनावर होऊन नको ती गोष्ट घडते. अशीच काहीशी घटना घडली ती अकोला जिल्ह्यातील तळेगाव ख़ुर्द गावात... नवऱ्याने रागाच्या भरात बायकोची कुऱ्हाडीने हत्या केली बघूया काय घडलं कारण..

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव ख़ुर्द गावात सोमवार (17 जून) रोजी एका व्यक्तीने स्वत:च्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे तळेगाव ख़ुर्द गावासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

रेणुका ढोले असं मृत महिलेचे नाव आहे. तर गजानन ढोले हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हे दोघेही पती पत्नी आहेत. रेणुका ढोले या आज शेतात पेरणी करण्यासाठी आले असता त्यांचा पती गजानन ढोले तेथे पोहोचला. आणि आपली पत्नीला शेतात पेरणी करायला विरोध केला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. आणि त्यांचा हा वाद शिगेला जाऊन पोहोचला.गजानन यांनी थेट रेणुका यांच्या अंगावर आणि हातावर कुऱ्हाडीने वार केले. हल्ल्यात रेणुका या गंभीर स्वरुपात जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.

ढोले दाम्पत्यात नेहमी किरकोळ गोष्टीवरून वाद होत असे. या वादादरम्यान रेणुका यांच्या माहेरच्या लोकांनी अनेकदा गजानन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही फरक पडला नाही. गजानन यांनी आपली शेती पत्नीच्या नावावर केली होती. तसेच पती गजानन ढोले हे पत्नी रेणुका यांच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची माहितीही समोर आली आहे. 

या घटनेतील आरोपी गजानन ढोले हा सध्या फरार असून हिवरखेड पोलिसांनी त्याच्या विरोधात खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत.आरोपीला शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group