राजकीय बातमी : भाजपला मोठा धक्का बसणार....'हा' बडा नेता फुंकणार तुतारी
राजकीय बातमी : भाजपला मोठा धक्का बसणार....'हा' बडा नेता फुंकणार तुतारी
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे पक्षांतर सुरू आहे. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये यंदा आमदार कोण याची जोरदार चर्चा रंगली आहे. या मतदारसंघामध्ये देखील जोरदार घडामोडी घडत आहेत. या ठिकाणचे माजी मंत्री आणि भाजपचे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

अशामध्येच आज हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील हे तुतारी हातामध्ये घेणार असल्याचे निश्चित झालं असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या फेसबुक अकाऊंटमध्ये बदल झाले होते. त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर भाजपचे कमळ चिन्ह दिसले नव्हते. याआधी ते माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघा अध्यक्ष असल्याचाही उल्लेख करत होते आणि कमळ चिन्हही ते वापरत होते. पण त्याच्या पोस्टमध्ये दिसलेल्या बदलावरून त्यांच्या शरद पवार गटामध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते.

आता हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिताने देखील आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर शरद पवार गटाचे तुतारी असलेल्या माणसाचे चिन्ह ठेवले आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून राष्ट्रवादीची पोस्टरबाजी करण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. आज मुंबईत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये तब्बल १ तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटीलसुद्धा उपस्थित होत्या.

हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांची मुलगी अंकिता पाटील देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी ११ वाजता इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करतील असे सांगितले जात आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group