काँग्रेस मध्ये मोठी राजकीय खळबळ : 'हे' ३ आमदार फुटणार? अजित पवारांनी थेट नावंच सांगितली
काँग्रेस मध्ये मोठी राजकीय खळबळ : 'हे' ३ आमदार फुटणार? अजित पवारांनी थेट नावंच सांगितली
img
Dipali Ghadwaje
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.   अशातच राज्याचा राजकरणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे.  कालच देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. आता आणखी ३ आमदार काँग्रेसला  सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. स्वता अजित पवारांनीच याबाबत माहिती देत सदर आमदारांची नावेच जाहीर केली आहेत.  त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

मुंबईत काल संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी आपल्या आगामी प्लॅनबाबत सांगितलं.

काय म्हणाले अजित पवार

विधानसभा निवडणुकीत आपल्याला ६० जागांवर तयारी करायची आहे. आपल्याकडे सध्या ५४ जागा आहेत, त्या तर आपण लढायच्याच आहेत.  मात्र इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोस्कर, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी आणि अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके हे सुद्धा आपल्या सोबत येणार आहेत असं अजित पवारांनी म्हंटल. याशिवाय अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, करमाळ्याचे संजयमामा शिंदे हे देखील आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे लवकरच हे सर्व नेते जाहीररीत्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

दरम्यान, महायुतीत आपल्याला ज्या काही जागा मिळतील त्या जागांवर जास्तीत जास्त काम करा इतर जागांवर थोडं काम कमी केलं तरी हरकत नाही असेही अजित पवारांनी म्हंटल. ही निवडणूक अत्यंत गंभीरपणे घ्या, डोळ्यात तेल घालून काम करा, हलगर्जी पणा करु नका, लोकसभेचं नरेटीव आपल्याला बदलायचं आहे अशा सूचना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.



त्यामुळे कोणतंही वक्तव्य करण्याआधी सुनील तटकरे आणि माझ्याशी बोला आणि मगच बाहेर येऊन स्टेटमेंट द्या असं अजित पवारांनी सांगितलं आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group