रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या...
रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या...
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी (दि. २० मार्च) सायंकाळी चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून आपला राजीनामा सुपूर्द केला. अशोक खरात सोबत फोटो समोर आल्याने चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती, त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी होत होती , अखेर काल त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.एक्स या माध्यमांवर त्यांनी पोस्ट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

सुनेत्रा पवार यांची पोस्ट 
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे.

अशोक खरातवर तीन गुन्हे दाखल
अशोक खरात याच्यावर महिलेने अत्याचाराचे आरोप केल्यानंतर नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी खरात याच्या मिरगाव येथील फार्म हाऊसची तपासणी केली असता एक पिस्तूल, काही संशयास्पद कागदपत्रे, काडतुसे सापडले आहेत. खरातविरुद्ध सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात अश्लील चित्रफित समाज माध्यमात टाकण्याची धमकी आणि पाच कोटींची खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरुन तसेच शिर्डी पोलीस ठाण्यात अश्लील छायाचित्र समाज माध्यमात टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group