व्हाट्सअप हा सोशल मीडियासोबत आता सर्वांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला असून जवळ जवळ सर्वच महत्वाची कामे जसे मेसेज व्हिडिओ कॉल ऑनलाईन पेमेंट असे महत्वाचे कामे व्हाट्सअप द्वारे केले जातात परंतु आता व्हॉट्सॲप युजर्ससाठी मोठी अपडेट समोर आली आहे.
सोशल मीडिया क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या मेटा कंपनीने जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप असलेल्या व्हॉट्सॲप युजर्ससाठी सर्वात मोठा बदल करण्याची तयारी केली आहे. व्हॉट्सॲप आता केवळ मेसेजिंग ॲप न राहता एक प्रीमियम अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच मेटा ‘व्हॉट्सॲप प्लस’ नावाचे एक प्रीमियम सबस्क्रिप्शन मॉडेल लाँच करणार आहे. या नवीन प्लॅनमुळे युजर्सला चॅटिंगचा एक वेगळा आणि अधिक वैयक्तिक अनुभव मिळणार आहे. जागतिक स्तरावर हे नवीन मॉडेल लाँच केले जाणार आहे.
व्हॉट्सॲप प्लस हे व्हॉट्सॲपचे एक सुधारित आणि सशुल्क व्हर्जन असेल. ही एक सबस्क्रिप्शन बेस्ड योजना असेल. ज्या वापरकर्त्यांना आपले व्हॉट्सॲप इतरांपेक्षा वेगळे दिसावे आणि ज्यांना अधिक तांत्रिक सोयी हव्या आहेत, त्यांच्यासाठी ही मॉडेल डिझाइन करण्यात आले आहे. ही सेवा व्हॉट्सॲप बिझनेससाठी नसून केवळ वैयक्तिक व्हॉट्सॲप मेसेंजर वापरणाऱ्यांसाठी देखील असणार आहे. तसेच सबस्क्रिप्शन न घेणाऱ्यांचे सामान्य व्हॉट्सॲप पूर्वीप्रमाणेच विनामूल्य
व्हॉट्सॲप प्लस ही एक मासिक शुल्क आकारली जाणारी सेवा असेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्याप्रमाणे आपण नेटफ्लिक्स किंवा डिस्ने हॉटस्टारसाठी पैसे भरतो, तसेच व्हॉट्सॲपमधील काही एक्स्ट्रा फीचर्ससाठी आता पैसे मोजावे लागतील. मात्र, कंपनीने स्पष्ट केले आहे की हे फिचर पूर्णपणे ऐच्छिक असेल. ज्यांना पैसे भरायचे नाहीत, त्यांचे नेहमीचे व्हॉट्सॲप मोफतच राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युरोपमध्ये याची किंमत दरमहा सुमारे २७९ रुपये (२.४९ युरो) इतकी आहे. भारतात या प्लॅनची किंमत किती असेल, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु, ती साधारण २०० ते ३०० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या फिचरची चाचणी काही निवडक अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांवर केली जात आहे. विशेषतः जे लोक कामासाठी व्हॉट्सॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तसेच ज्यांना चॅटिंगचा अनुभव अधिक प्रोफेशनल हवा आहे, त्यांच्यासाठी हे फिचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.