'' मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही ...'' काय म्हणाले मुख्यमंत्री ?
'' मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही ...'' काय म्हणाले मुख्यमंत्री ?
img
दैनिक भ्रमर

महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष मराठा आरक्षणाकडे लागले आहे . यासाठी वेळोवेळी आंदोलने आणि  उपोषणे केली गेली , तसेच  मराठा आंदोलक  मनोज जरांगे पाटील  देखील  यासाठी गेले कित्येक दिवसापासून  लढा देत आहेत. दरम्यान , त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असे जाहीर केलेय . अशातच आता आगामी निवडणूकही तोंडावर आसल्याने सरकारलाही या विधायि काही ठोस निर्णय  घ्यावेच लागणार आहेत , दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे . 

तसेच ,  मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. पण इतर कोणाच्या ही आरक्षणाला न धक्का लावता मराठा आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. काही लोकं या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जात आहेत. जरांगे यांनी देखील याचा विचार केला पाहिजे की कोण या विरोधात कोर्टात गेले आहे असेही ते म्हणाले . 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या तक्रारी असतील. ज्यांनी जे घोटाळे केले असतील. शेतकऱ्यांशी दगाबाजी करण्याऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. शेतकरी आमचा अन्नदाता, मायबाप आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार उभे आहे. कायम उभे राहिल. अशा प्रकारच्या घटना खपवून घेतले जाणार नाही.  सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे. आम्ही निर्णय घेतला मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. ते टिकवलं. काही लोकं याच्या विरोधात गेले आहेत. ते कोण आहेत याचा विचार मनोज जरांगे पाटील यांनी केला पाहिजे. आरक्षण रद्द व्हावे म्हणून कोण प्रयत्न करत आहे. जेव्हा आरक्षण देण्याची संधी होती तेव्हा आरक्षण दिले नाही. आता आरक्षण आम्ही दिले तर ते रद्द व्हावं म्हणून कोण प्रयत्न करतंय.

कुणबी नोंदी प्रमाणपत्र देण्याचं काम शिंदे समिती करत आहे. सगसोयरेच्या बाबतीत कार्यवाही आणि आक्षेप तपासले जात आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास सकारात्मक आहे. कुठलाही इतर समाजचे,ओबीसीचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group