रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
img
दैनिक भ्रमर
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर राजीनाम्याबाबत एक पोस्ट केली आहे.



अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांची आग्रही मागणी होती. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकर यांनी राजीनामा सोपवला आहे. याआधी चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता.

त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आता त्यांनी राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सोपवला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group