अकोल्यात एक संतापजनक घटना घडली आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या धक्कादायक प्रकरणे सर्वत्र एकच खळबळ उडालीय हे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणजेच सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. मात्र अकोल्यात एका पोलीस उपनिरीक्षकाने (ASI) या ब्रीदवाक्याला हरताळ फासल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये असलेल्या एका आरोपी महिलेला तुझ्या मुलीला आणून दे, अशी मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुझ्या मुलीला १० हजार रुपये देतो, तिला एक रात्र माझ्याकडे पाठव, अशी मागणी केल्याचा खळबळजनक आरोप या पोलीस कर्मचाऱ्यावर झाला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
अटकेत असलेली संबंधित महिलेला सायबर पोलिसांनी एका ८० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक केली होती. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीत असताना तिथे कार्यरत असलेले ASI राजेश जाधव यांनी ही मागणी केल्याचा दावा या महिलेने केला. आपल्याच विभागातील एका जबाबदार अधिकाऱ्याने इतकं नीच कृत्य केल्याचं समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले.
वरिष्ठांनी संबंधित एएसआयची सर्वांसमोर चांगलीच कानउघडणी केली आणि त्यांना कडक शब्दांत झापले. लाज वाटते, तू वर्दी चढवली आहेस असं म्हणते वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या पोलिसाची खरडपट्टी काढली. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालं होते.