मुंब्रा हिरवं करू म्हणणाऱ्या सहर शेखला पोलिसांची नोटीस
मुंब्रा हिरवं करू म्हणणाऱ्या सहर शेखला पोलिसांची नोटीस
img
वैष्णवी सांगळे
मुंब्रा येथील AIMIM नेत्या आणि नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेखच्या वक्तव्यानंतर चांगलाच गदारोळ उडाला आहे. पक्षाची सर्वात तरूण नगरसेविका सहर शेख हिनं विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांना खुलं आव्हान दिलं होतं. 

विजयानंतरच्या सभेत सहर शेख यांनी, “काहींना वाटत होतं आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे,” असं वक्तव्य केलं होतं. पुढे बोलताना त्यांनी, “पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठं उत्तर द्यायचं आहे. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे,” असं विधान केलं होतं. याच वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 

वाद वाढल्यानंतर सहर शेख यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. “हिरवा हा आमच्या पक्षाचा रंग आहे. रंग कोणत्याही धर्माशी जोडलेले नसतात. संविधानात कुठेही हिरवा मुस्लिमांचा आणि भगवा हिंदूंचा रंग आहे असं नमूद नाही. माझं वक्तव्य धर्माच्या आधारावर नव्हतं, तर राजकीय आशयाचं होतं,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, कैसे हराया...असं म्हणून विरोधकांना डिवचणाऱ्या सहर शेखचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. याशिवाय मुंब्रा हिरवं करू, असं विधान करून नवा वाद निर्माण झाला होता. यावरून आता मुंब्रा पोलिसांनी सहर शेखला नोटीस बजावली आहे.

कोणाच्याही भावना दुखावतील असं भाषण करू नये, अशी समज तिला देण्यात आली आहे. सहर शेखच्या विधानावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. तसेच मुंब्रा पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले होते. त्यावर पोलिसांनी तिला नोटीस बजावून समज दिली आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे मुंब्रा परिसरातील राजकीय वातावरण तापलं आहे.
MIM | mumbra |
इतर बातम्या
Join Whatsapp Group