केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी सकाळी वंदे मातरम् संबंधी नवीन नियम जारी केले आहेत. सर्व सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगान ‘जन, गण, मन’ च्या आधी राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’चं गायन बंधनकारक करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींच्या येण्या-जाण्याच्यावेळी, औपचारिक सरकारी कार्यक्रमात, राष्ट्रपतींनी ऑल इंडिया रेडिओ आणि टेलीविजनवरुन देशाला संबोधित करण्याच्या आधी आणि नंतर राज्यपाल किंवा लेफ्टिनेंट राज्यपाल येण्या-जाण्याच्यावेळी, राष्ट्रीय परेडमध्ये वंदे मातरम् गायन करावं असे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, वंदे मातरम् संबंधी केंद्र सरकारच्या या नव्या नियमांना MIM चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आणि इंडिया मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शोएब जमई यांनी विरोध केला आहे. त्यांनी या संबंधी सोशल मिडिया एक्सवर पोस्ट केली आहे.
डॉ शोएब जमई यांची पोस्ट
“वंदे मातरम् राष्ट्र गीत नाही तसच ते संविधानाचा भागही नाही. लोक आपल्या आस्थेने मर्जीने गायचे. पण भाजप आणि RSS ने या गीताला प्रोपेगेंडा बनवलय. त्यांना जबरदस्ती आमच्यावर लादायचं आहे. मग ऐका, आमच्या मानेवर सुरी ठेवली तरी आम्ही नाही गाणार”
डॉ शोएब जमई यांच्या या पोस्टमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.