कॉलेज परिसरात आढळला मृतदेह, विद्यार्थ्यांची धावपळ
कॉलेज परिसरात आढळला मृतदेह, विद्यार्थ्यांची धावपळ
img
दैनिक भ्रमर
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका महाविद्यालय परिसरात वयस्कर व्यक्तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी समोर आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित अनेक प्रकरणं समोर येत असताना महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. सुभाष कामठे असे 65 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सुभाष कामठे मूळचे पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहण्यास असल्याची प्राथमिक माहिती असून ते गेल्या 2 दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. तसेच, कामठे यांना दारूचे देखील व्यसन असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


Pune |
इतर बातम्या
Join Whatsapp Group