'आम्हीच इथले भाई' म्हणत निलेश घायवळ टोळीकडून प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार
'आम्हीच इथले भाई' म्हणत निलेश घायवळ टोळीकडून प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार
img
वैष्णवी सांगळे
पुण्यात वाढणारी गुन्हेगारी सर्वसामान्यांच्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे. पुण्यात अलीकडेच झालेल्या टोळीयुद्धानंतर आता सामान्य नागरिकांनाही गुंडांच्या दहशतीला सामोरं जावं लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोथरूड परिसरात कुख्यात निलेश घायवळ टोळीच्या सदस्यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीवर गोळीबार केला.गोळीबारात ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत. सध्या त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पुणे शहरातील नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा खून होऊन वर्ष होत नाही तोवर त्या खून प्रकरणातील गणेश कोमकरचा मुलगा आयुषचा आंदेकर टोळीतील दोघांनी गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी १३ आरोपींना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले. ही घटना ताजी असतानाच कोथरूड भागात बुधवारी रात्री निलेश घायवळ टोळीतील चार जणांकडून दुचाकीवरून जाणार्‍या प्रकाश मधुकर धुमाळ याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, गाडीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही जीवघेणी कारवाई करण्यात आली.गोळीबार होताच जीव वाचवण्यासाठी प्रकाश धुमाळ जवळील एका इमारतीकडे धावले. यावेळी स्थानिक सचिन गोपाळघरे यांनी धुमाळ यांना मदत केली. घायवळ टोळीतील मयूर कुंबरे याने थेट गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान हा घटनेसह आरोपींना आणखी एका सामान्य नागरिकावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. 

प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर याच आरोपींनी वैभव साठे या आणखी एका नागरिकावर कोयत्याने वार केलेत. प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे गुन्हेगार सागर कॉलनी या ठिकाणी गेले आणि तिथे उभ्या असलेल्या वैभव साठे यांच्यावर विनाकारण हल्ला केला आहे. निलेश घायवळ टोळीतील हे गुन्हेगार हल्ला करताना "आम्ही इथले भाई आहोत" असं म्हणत  दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, पोलिसांचा धाक या आरोपींना उरला आहे की नाही असे सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहेत.'


Pune |
इतर बातम्या
Join Whatsapp Group