नांदूर नाका येथील "राहुल धोत्रे" खुनातील फरार असलेले माजी नगरसेवक उद्धव निमसे स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाले आहेत. राहुल धोत्रे याच्या हत्येनंतर माजी नगरसेवक उद्धव निमसे फरार होते. दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी हायकोर्टात अर्ज दिला होता. मात्र हा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे उद्धव निमसे मोठ्या अडचणीत सापडले होते.
नेमकं प्रकरण काय ?
पंचवटीतील नांदूर नाका येथे किरकोळ वादातून टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे या युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे या प्रकरणात आरोपी असल्याचा धोत्रे या मृत युवकाच्या कुटुंबाने केला होता. मृत युवकाचे कुटुंंबिय, नातेवाईकांसह स्थानिकांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेत माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक करण्याची मागणी केली होती.
राहुल धोत्रे याच्या हत्येनंतर माजी नगरसेवक उद्धव निमसे फरार होते. दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी हायकोर्टात अर्ज दिला होता. मात्र हा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे उद्धव निमसे मोठ्या अडचणीत सापडले होते. आज अखेर नांदूर नाका येथील "राहुल धोत्रे" खुनातील फरार असलेले माजी नगरसेवक उद्धव निमसे स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाले आहेत.