'ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो' अभिनेते रिचर्ड राउंडट्री यांचे निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
'ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो' अभिनेते रिचर्ड राउंडट्री यांचे निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
img
Dipali Ghadwaje
'ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो' म्हणून जगभरात लोकप्रिय असणारे अभिनेते रिचर्ड राउंडट्री यांचे निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पॅनक्रिएटिक कर्करोगामुळे  त्यांचे निधन झाले आहे. रिचर्ड यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

1971 मध्ये आलेल्या 'शाफ्ट' या सिनेमाच्या माध्यमातून रिचर्ड यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या पहिल्याच सिनेमाने त्यांना रातोरात सुपरस्टार केलं. अमिरिकेच्या इतिहासतला हा पहिलाच ब्लॅक्सप्लिटेशन सिनेमा आहे. 'शाफ्ट' या सिनेमात रिचर्ड यांनी खासगी गुप्तहेराची भूमिका साकारली होती. दमदार कथानक आणि रिचर्डच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. या सिनेमाच्या यशानंतर अनेक सीक्वेल्स आणि छोट्या पडद्यावरील मालिकाही आल्या आहेत. 

रिचर्ड यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आफ्रिका आणि अमेरिकेच्या मनोरंजनसृष्टीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. सिनेसृष्टीतील त्यांचं योगदान विसरता येणार नाही. रिचर्ड राउंडट्री हे अमिरेकेचे पहिले ब्लॅक अॅक्शन हीरो आहेत. रिचर्ड यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group