मी तुझ्यावर प्रेम करतो, शाळेतच विद्यार्थिनीचा हात पकडला अन्...शिक्षकाचे धक्कादायक कृत्य
मी तुझ्यावर प्रेम करतो, शाळेतच विद्यार्थिनीचा हात पकडला अन्...शिक्षकाचे धक्कादायक कृत्य
img
वैष्णवी सांगळे
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शाळेमध्येच विद्यार्थिनीचा हात पकडून शिक्षकाने विद्यार्थिनीला प्रपोज केल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला. साताऱ्यातील कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील एका शाळेत ही धक्कादायक घटना घडली.  इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकाने शाळेतच प्रपोज करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलवले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन वर्गाबाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबण्यास सांगितले. त्यानंतर हा शिक्षक या विद्यार्थिनीला म्हणाला की,'मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस तू? मी तुझ्यावर प्रेम करतो.'

या शिक्षकाने शाळेमध्येच विद्यार्थिनीचा हात पकडून तिला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. शिक्षकाचे हे बोलणे ऐकून विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. तिने शिक्षकाचा हात झटकला आणि वर्गामध्ये धाव घेतली. त्यानंतर या मुलीने घडलेली घटना आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. रविवारी कराड शहर पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Satara |
इतर बातम्या
Join Whatsapp Group