राज्यातील राजकरणातील घडामोडींना वेग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यसरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची महिती आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काटकसर आणि बचतीची त्रिसूत्री सांगितली आहे. पेट्रोल-डिझेलची बचत करावी. सोने एक वर्षे खरेदी करू नये आणि खाद्यतेलाचा वापर कमी करावा असे आवाहन मोदी यांनी केले आहे. त्यानंतर आज राज्यात हालचालींना वेग आला आहे. सकाळपासूनच बैठकांचे सत्र सुरू आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत धडाकेबाज निर्णय घेणे अपेक्षित आहे.
सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठक घेणार आहेत. पोलिस महासंचालक, मुख्य सचिव या बैठकीला उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मंत्रालयात घडामोडींना वेग आला आहे. आज सकाळी एक बैठक झाली. दुपारी एक दुसरी बैठक झाली. आता दोन्ही बैठकीनंतर एकत्रित निर्णय जाहीर होणार आहे. सुरक्षेशी तडजोड न करता ताफ्यातील वाहनसंख्येवर मर्यादा आणण्यात येणार आहे. सर्व मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर येणार आहे. यावर गांभीर्याने विचार करण्यात येणार आहे. विचाराअंती एकत्रित निर्णय दुपारच्या बैठकीनंतर जाहीर होणार आहे.