वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी ; ''ही'' गोष्ट न केल्यास भरावा लागेल दंड ! ''ही'' आहे शेवटची तारीख
वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी ; ''ही'' गोष्ट न केल्यास भरावा लागेल दंड ! ''ही'' आहे शेवटची तारीख
img
Nandini khandare More



देशासह राज्यतील अनेक महत्वाच्या बाबींमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. दरम्यान आता एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. 
महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची  बातमी समोर आली आहे. 

राज्यातील वाहन सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्या जुन्या वाहनांना अजूनही उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट बसवलेली नाही, अशा वाहनधारकांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट इशारा दिला आहे.

दरम्यान, राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना HSRP प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यापूर्वी यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्याप अनेक वाहनांना ही प्लेट बसवलेली नसल्याने आणि वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, ही शेवटची संधी असून वाहनधारकांनी ३० जून पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी.

जर तुम्ही ३० जून २०२६ पर्यंत आपल्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवली नाही, तर १ जुलैपासून तुम्हाला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून मोटार वाहन कायद्यानुसार १ हजार रुपयांपर्यंत तडजोड शुल्क (Compounding Fees) वसूल केले जाईल.

HSRP का आवश्यक आहे?

वाहन चोरी रोखणे आणि बनावट नंबर प्लेट्सचा वापर करून होणारे गुन्हेगारी कृत्य थांबवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. “केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही यंत्रणा राबवली जात असून, यामुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे,” असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group