मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या  ''या'' बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या ''या'' बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
img
Nandini khandare More



राजकारणातली सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादीला सर्वांत  मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे बडे नेते आनंद परांजपे यांनी अचानक सर्व पदांचे राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.त्यांना विधान परिषद न मिळाल्याने ते नाराज म्हटले जात होते.
त्यांनी त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. विधान परिषद न मिळाल्याने ते नाराज होते असे म्हटले जात आहे.


आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर एक पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात की मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा 14 वर्षाचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे..! असे त्यांनी या पोस्ट मध्ये नमूद केले आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group