१४ मे २०२६
देशात अनेंक मोठ्या घडामोडी घडत असून अनेक मोठे निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येत आहेत. दरम्यान आता साखर निर्णयातीबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
देशातील वाढत्या साखर दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत साखर निर्यातीवर तातडीने बंदी लागू केली आहे. सरकारच्या माहितीनुसार, देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा आणि किमती स्थिर ठेवता याव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.ही बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे कच्ची, पांढरी आणि रिफाइंड साखरेच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे.
साखर उत्पादनात घट आणि वाढती मागणी लक्षात घेता सरकारने निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे देशांतर्गत ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरांमध्ये चढ-उतार दिसू शकतात.भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश मानला जातो. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय साखर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या वाढत्या किमती आणि देशांतर्गत उपलब्धता लक्षात घेऊन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या साखर निर्यातीसंदर्भातील करारांवर यापूर्वीच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत किंवा ज्या व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या करारांनुसार साखर निर्यात केली जाणार आहे. मात्र, यापुढे नवीन निर्यात करारांना परवानगी दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Copyright ©2026 Bhramar