नीटपरीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात खळब निर्माण झाली होती. याचदरम्यान मात्र आता एक मोठी बातमी अमोर आली आहे. नीट परीक्षा 2026 ची नवीन तारीख जाहीर करण्यात आलीये. 21 जून 2026 रोजी नीट परीक्षा देशभरात पार पडणार आहे. नवीन तारीख आयोगाकडून जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नीट परीक्षा द्यावी लागणार आहे. या पेपरफुटीमुळे मोठा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. पेपरफुटीचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी याबाबत एक बैठकही घेतली. आता नवीन तारीख जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना देखील अभ्यासाकरिता वेळ देण्यात आला. नीट परीक्षा 2026 चा पेपर नक्की कसा फुटला याबाबत एक एक करून माहिती पुढे येत आहे. कसून तपास सीबीआय या प्रकरणात करत आहे. 21 जून रोजी पुन्हा एकदा नीट परीक्षा होणार आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की , आता 21 जून रोजी होणारा नीटचा पेपर फुटणार नाही, याबाबत काळजी घेतली जात आहे. या प्रकरणात काही मोठे नावेही पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयोगाने अगोदरच सीबीआयला सर्व मदत करणार असल्याचे स्पष्ट केले. नीट परीक्षेच्या पेपरफुटीविरोधात अनेक आंदोलनेही झाली. त्यानंतर नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान , नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर काल रात्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत उच्चस्तरीय बैठक सुरू होती. ही बैठक तब्बल दोन तास चालली. अखेर आज नीट परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. उच्च शिक्षण सचिव सचिन विनीत जोशी, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, अभिषेक सिंह, राहुल सिंग आणि महत्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.