सातपुर- नुकताच खुतवड नगरचा डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेला अपघात ताजा असतानाची घटना विसरत नाही तोवर लगेच बारावी परीक्षेत कॉमर्स मध्ये 75 टक्के मिळून पास होत भविष्यात चार्टड अकाउंट होण्याची स्वप्न पाहणारा चेतन पाटील(18, रा. मौले सिटी श्रमिक नगर ) याचा बुधवारी ( दि. 13) सकाळी सव्वा आठ वाजता श्रमिक नगर कार्बन नाका परिसरात झालेल्या अपघातानंतर खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयशर गाडी ताब्यात घेतले असून चालक फरार आहे तसेच सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार राकेश बनकर पुढील तपास करत आहेत. चेतन पाटील मित्र विकास शर्मा सोबत जात असताना श्रमिक नगर कार्बन नाका परिसरातील शाळेजवळ आयशर गाडी (क्र.एम एच 19 झेड 4236) ने सकाळी सव्वा आठ वाजता दुचाकीस धडक दिली. या चेतनच्या डोके व छातीला मार लागला असता त्याला तात्काळ जखमी अवस्थेत विचारासाठी सातपूरच्या कार्बन नाका परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा जरा दरम्यान मृत्यू झाला. तसेच त्याचा मित्र विकास शर्मा याच्या हाताला फॅक्चर झाल्या असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
चेतन पाटील यांचे वडील घंटागाडीवर चालक आहेत. चेतन हा परिसरातील पाचवी ते नववी होतकरू विद्यार्थ्यांना तो मोफत क्लासमध्ये त्यांना अभ्यासात मदत करत असे. त्याच्या बच्चन आई वडील व एक लहान बहिण असा परिवार आहे. आपला मुलगा मृत्यू झाल्यानंतरही चेतनच्या पालकांनी दुःखातून सावरत चेतनचे नेत्रदान करून त्याला आपल्यातच ठेवण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.