दरवाढीची ठिणगी ! पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढणार ?
दरवाढीची ठिणगी ! पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढणार ?
img
Nandini khandare More



इराण अमेरिका संघर्षाच्या झळा जगभरातील अनेक देश सहन करत आहेत. दरम्यान याचा परीणाम म्हणजे महागाई,, अशी महागाई जी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही . दरम्यान आता अशीच एक काळजी बवाढवणारी बातमी समोर येत आहे. 

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली भारतात तब्बल चार वर्षानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये 15 मे रोजी वाढ झाली. 3 रूपये प्रति लिटरने ही वाढ करण्यात आली. पेट्रोल डिझेलच्या वाढीनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्येत वाढ झाली. मात्र, यादरम्यानच तज्ज्ञांनी झोप उडवणारा इशारा दिला. जर पुढील 3 ते 4 महिने जागतिक बाजारात तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्या तर भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये यापेक्षा अधिक वाढ होऊ शकते. हा इशारा अशावेळी आला, ज्यावेळी जागतिक बाजारात सतत तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. ब्रेट क्रूड ऑयलच्या किमती 110 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. 

तज्ज्ञांचे स्पष्ट म्हणणे आहे की, तेलाच्या वाढत्या किमतीमध्ये कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किमत 90 ते 100 डॉलर प्रति बॅरल होत्या. आता त्यामध्येच थेट वाढ झाली. तीन ते चार वर्षाच्या विचार करत किमतीमध्ये वाढ झालीये. चॉईसच्या ऊर्जा विश्वेषक धवल पोपट यांनी म्हटले की, सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढून थोडासा दिलासा दिला. मात्र, त्यांच्या नुकसानाचा आकडा अत्यंत मोठा आहे.

भारत आपल्या तेलाचा गरज भागवण्याकरिता जवळपास 85 टक्के तेल आयात करतो. मध्य पूर्वेत तणाव असल्याने तेल कंपन्यांवर दबाव वाढला आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने तणाव अधिक आहे. इकोनॉमिस्टने मोठा इशारा देत म्हटले की, सतत महागाई वाढत आहे, त्याचा थेट घरगुती बजेटवर परिणाम होईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भविष्यात इंधनांच्या वाढणाऱ्या किमतीमध्ये सरकारला हस्तक्षेप करावा लागणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group