पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय ! काय आहे जाणून घ्या
पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय ! काय आहे जाणून घ्या
img
Nandini khandare More



इराण आणि अमेरिका संघर्षांच्या पार्श्वभूमीवर जगासह देशभरात मोठया घडामोडी घडत असून एकच खळबळ निर्माण  झाली आहे. या संघर्षाच्या झळा देशाला सहन कराव्या लागत असून काल पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ केंद्र सरकारकडून करण्यात आली. 

तब्बल 3 रूपयांनी पेट्रोल आणि डिझेल वाढले आहे. दरम्यान आता सरकारकडून आता ग्राहकांनंतर थेट पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दणका देण्यात आला. पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यालाही मोठा धक्का सरकारकडून देण्यात आला. पेट्रोलियम कंपन्यांच्या परदेशी नफ्याला आळा घालण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारने पेट्रोल निर्यातीवर प्रति लिटर 3 रुपये अतिरिक्त नफा कर लावला आहे. हा थेट पेट्रोलियम कंपन्यांसाठी मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. याचा थोडक्यात अर्थ असा होतो की, एखाद्या पेट्रोलियम कंपनीने परदेशात पेट्रोल निर्यात केले तर तिला मिळणाऱ्या नफ्यावर सरकारला प्रति लिटर 3 रुपये कर भरावा लागेल. हा सरकारचा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल.

बऱ्याच तेल कंपन्या परदेशात पेट्रोल निर्यात करतात. आता त्यावरही सरकारकडून शुल्क आकारण्यात आले. अशा तेल कंपन्यांना सरकारला पैसा द्यावा लागणार आहे. इराण आणि अमेरिका युद्धात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉलरपुढे रूपयाची किमती कमी होत आहे. यामुळेच केंद्र सरकारने काही गोष्टी नियंत्रणात आणण्याकरिता महत्वाचे आदेश काढली आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group