महागाईत भर ! मोबाईल रिचार्जचेही दर वाढणार ?
महागाईत भर ! मोबाईल रिचार्जचेही दर वाढणार ?
img
Nandini khandare More




इराण अमेरिका संघर्षाच्या झळा आता सामान्य माणसाच्या खिशाला बसू लागल्या आहेत. या संघर्षामुळे जगभरात खळबळ माजली आहे . दरम्यान देशात आधी गॅस सिलेंडर, इंधन वीज बिल यानंतर आता आणखी एका गोष्टीचे दार वाढणार असलायची शक्यता समोर आली आहे. अनेकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलेला मोबाईल रिचार्जही आता महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. काही शहरांमध्ये पेट्रोलचा दर 107 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे वाहन चालवणाऱ्यांच्या खर्चात आधीच वाढ झाली आहे. पण या इंधन दरवाढीचा परिणाम फक्त वाहनांपुरता मर्यादित राहणार नसून, त्याचा थेट परिणाम मोबाईल नेटवर्क आणि रिचार्ज प्लॅन्सवरही होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचा मोबाईल रिचार्जशी काय संबंध?पहिल्या नजरेत हा संबंध विचित्र वाटू शकतो. मात्र, मोबाईल नेटवर्क सुरू ठेवण्यासाठी देशभरात हजारो मोबाईल टॉवर्स सतत कार्यरत असतात. हे टॉवर्स चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज आणि डिझेलची गरज असते.

विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक मोबाईल टॉवर्स अजूनही डिझेल जनरेटरवर अवलंबून आहेत. त्यामुळे डिझेलचे दर वाढले की या टॉवर्सचा खर्चही वाढतो. अहवालांनुसार, कोणत्याही मोबाईल टॉवरच्या एकूण ऑपरेशनल खर्चातील जवळपास 40 टक्के हिस्सा हा वीज आणि इंधनावर खर्च होतो.

दूरसंचार कंपन्यांवर वाढतोय खर्चाचा ताणदेशातील मोठ्या दूरसंचार कंपन्यांसाठी सर्वात मोठं आव्हान म्हणजे संपूर्ण नेटवर्क सुरळीत ठेवणं. पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यामुळे नेटवर्क चालवण्याचा खर्च झपाट्याने वाढू शकतो. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, प्रमुख टेलिकॉम कंपन्या दरवर्षी फक्त डिझेलवरच शेकडो कोटी रुपये खर्च करतात.

त्यातच आता देशभरात 5G नेटवर्कचा विस्तार वेगाने सुरू आहे. 5G टॉवर्स जुन्या नेटवर्कच्या तुलनेत अधिक वीज वापरतात आणि त्यांना सतत उच्च क्षमतेचा पॉवर सप्लाय आवश्यक असतो. त्यामुळे कंपन्यांचा ऑपरेशनल खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्सनुसार, कंपन्या आधीपासूनच टॅरिफ वाढीच्या तयारीत होत्या. मात्र, इंधन दरवाढीमुळे हा निर्णय अपेक्षेपेक्षा लवकर घेतला जाऊ शकतो

दरम्यान, टेलिकॉम क्षेत्रात आधीपासूनच नेटवर्क उपकरणे, बॅटरी आणि इतर हार्डवेअरच्या किमती वाढल्या आहेत. जागतिक पुरवठा साखळीतील अडचणींमुळे या खर्चात आणखी वाढ होत असल्याचं सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत, दूरसंचार कंपन्या रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवण्याचा विचार करू शकतात. काही रिपोर्ट्सनुसार, कंपन्या आधीपासूनच टॅरिफ वाढीच्या तयारीत होत्या. मात्र, इंधन दरवाढीमुळे हा निर्णय अपेक्षेपेक्षा लवकर घेतला जाऊ शकतो.

सामान्य ग्राहकांच्या खिशावर पुन्हा ताणजर मोबाईल रिचार्ज महाग झाले, तर त्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या मासिक बजेटवर होईल. कारण आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट ही लक्झरी नसून गरज बनली आहे. ऑनलाइन काम, शिक्षण, बँकिंग, मनोरंजन आणि सोशल मीडियासाठी लोक पूर्णपणे मोबाईल डेटावर अवलंबून आहेत. म्हणूनच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींचा फटका आता केवळ वाहनधारकांनाच नाही, तर प्रत्येक मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीलाही बसू शकतो.

इतर बातम्या
Join Whatsapp Group