राज्यात ओबीसी आंदोलनाची ठिणगी पेटणार ?  बड्या नेत्याची  घोषणा”
राज्यात ओबीसी आंदोलनाची ठिणगी पेटणार ? बड्या नेत्याची घोषणा”
img
Nandini khandare More




राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता मराठा आरक्षण आंदोलनावरून पुन्हा एकदा महाराष्ट्र तापण्याची शक्यता आहे. तशी घोषणाच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. याचदरम्यान आता आणखी एक बातमी समोर येत आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. ते येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटीमध्ये आपल्या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.  

दरम्यान ,  मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा करताच आता राज्यात वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेवर ओबीसी नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मोठा इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आंदोलन करत असतील आणि त्याच विषयाला घेऊन ते आंदोलन करत असतील तर त्याला काही अर्थ नाही.  जेव्हा त्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या, त्याचा जीआर काढला तो जीआर यांनी वाचून त्याला सहमती दिली त्यानंतर त्यांनी गुलाल उधळला. मग आता त्याच विषयाला घेऊन आंदोलन करणार हे कशासाठी? असा सवाल यावेळी तायवाडे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जरांगे पाटील नवीन विषय घेऊन आंदोलन करत असतील तर समजू शकतो, परंतु विषय तोच आहे. मराठा समाजासाठी ते आंदोलन करत आहेत,  मात्र या परिस्थितीत ओबीसी समाजाला दिलेला शब्द सरकारने पळाला नाही, तर ओबीसी समाजासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी घोषणा यावेळी तायवाडे यांनी केली आहे.  ओबीसी आपल्या न्यायहक्कांसाठी आंदोलनाला बाराही महिने तयार असतो, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा ओबीसी आंदोलन देखील पेटण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group