राज्याती राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून बड्या नेत्यानं शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद पराजंपे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये आनंद पराजंपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी दादा भुसे यांनी पक्षाच्या वतीनं आनंद परांजपे यांचं स्वागत केलं. ‘माजी खासदार पराजंपे आज स्वगृही शिवसेनेत परत आलेले आहेत, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, त्यांचं मी स्वागत करतो. त्यांना शिवसेना सांगायची गरज नाही, कारण त्यांचा प्रवास शिवसेनेत सुरु झाला होता.’ अशी प्रतिक्रिया यावेळी दादा भुसे यांनी दिली आहे.
दरम्यान, आनंद परांजपे यांनी आजच राष्ट्रवादीमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली होती. शेवटी त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.