खळबळजनक !   रशियाकडून थेट चीनच्या जहाजावर मोठा हल्ला
खळबळजनक ! रशियाकडून थेट चीनच्या जहाजावर मोठा हल्ला
img
Nandini khandare More
सध्या इराण अमेरिकेच्या संघर्षामुळे संपूर्ण जगभरात खळबळ निर्माण झाली असून या युद्धाचा झळा संपूर्ण जगाला सोसाव्या लागत आहेत. याचदरम्यान आता पुन्हा एक टेन्शन वाढवणारी अपडेट समोर येत आहे. रशियाने थेट जिगरी मित्र चीनच्या जहाजावर हल्ला केला. हा हल्ला संपूर्ण जगाला हैराण करून सोडणारा  आहे. 



समोर आलेलया माहितीनुसार,  धक्कादायक बाब म्हणजे रशियाचे अध्यक्ष पुतिन लवकरच चीन दाैऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या चीन दाैऱ्यापूर्वीच हा हल्ला झाल्याने चर्चेला उधाण आले. युक्रेने दावा केला की, रशियाने त्याचा मित्र चीनच्या जहाजावर हल्ला केला. अल जझीराच्या वृत्तानुसार, युक्रेनने रशियावर गंभीर आरोप करत म्हटले की, काळ्या समुद्रात रशियन ड्रोनने चीनच्या जहाजाला टार्गेट करत हल्ला केला. युक्रेनच्या या दाव्याने सर्वांना मोठा धक्का बसला. एकीकडे इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. होर्मुज खाडीत जहाजांवर मोठे हल्ले केले जात आहेत. थेट काही जहाज बुडवण्यात देखील आली. होर्मुज खाडीत चीनच्या जहाजावर मोठा हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा चीनच्या जहाजावर हल्ला करण्यात आला.

हा हल्ला रशियाकडून करण्यात आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. युक्रेनने रशियाकडून भूभाग परत मिळवला आणि त्याच्या काही भागांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले. युक्रेनियन बंदर प्राधिकरणाच्या माहितीनुसार, हल्ल्यांमध्ये दोन नागरी जहाजांना रशियाकडून टार्गेट करत हल्ला करण्यात आला. त्यापैकी एक मार्शल बेटाचे ध्वज असलेले जहाज होते तर दुसरे गिनी बिसाऊच्या ध्वजाखाली जहाज होते.

दोन्ही जहाजे ओडेसा भागातील बंदरांकडे जात होती. यादरम्यानच या जहाजावर हल्ला झाला. युक्रेनियन नौदलाने म्हटले की, चिनी मालकीचे केएसएल देयांग या मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला. या जहाजावर चिनी कर्मचारी होते आणि ते मार्शल बेटांच्या ध्वजाखाली कार्यरत होते. युक्रेनियन नौदलाने जहाजाचा एक फोटोही शेअर केला. त्यात जहाजाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ओडेसा हे युक्रेनसाठी एक महत्त्वाचे सागरी केंद्र आहे. तिथे मोठ्या प्रमाणात रशियाकडून हल्ला केला जात आहे. मात्र, रशियाकडून चीनच्या जहाजावर हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली. आता युक्रेनकडून हीच गोष्टी मोठी केली जात असून तिला रंगवले जात आहे. यावर अजूनही चीनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

इतर बातम्या
Join Whatsapp Group