''या'' कारणाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढणार? काय आहे प्रकरण?
''या'' कारणाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढणार? काय आहे प्रकरण?
img
Nandini khandare More




पुण्यातून एक बातमी समोर येत आहे. पुण्यातील मुंढवा भागातील प्रसिद्ध ‘बॅस्टियन’ क्लब एका व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही युवक-युवती कथितरित्या आक्षेपार्ह वर्तन करताना दिसत असल्याचे म्हटले जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्याशी संबंधित असल्याने या प्रकरणाकडे अधिक लक्ष वेधले गेले आहे. या घटनेनंतर पुण्यातील नाईटलाइफ, पब संस्कृती आणि अशा ठिकाणी होणाऱ्या प्रकारांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मोठ्या आवाजातील संगीत, डान्स फ्लोअरवरील गर्दी आणि मद्यधुंद वातावरण दिसून येत आहे. याच दरम्यान काही तरुण आणि तरुणी क्लबमधील सोफ्यावर बसून सर्वांसमोर अश्लील चाळे करत असल्याचे दृश्य कथितरित्या व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. विशेष म्हणजे क्लबमध्ये त्या वेळी शेकडो लोक उपस्थित असल्याचेही दिसून येत आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत केला जात असून अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे अश्लील वर्तन होत असल्यामुळे नागरिक आणि पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या व्हिडिओची सत्यता आणि तो नेमका कधीचा आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group