डिझेल खरेदीसाठी सरकारचे नवे नियम; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार
डिझेल खरेदीसाठी सरकारचे नवे नियम; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार
img
Nandini khandare More


देशभरात सध्या इंधन टंचाई निर्माण झाली असून कमालीची दर वाढ होत असल्याने नागरिक चांगलेच टत्रस्त झाले असून शेतकऱ्यांसमोर आता ही इंधन टंचाई मोठं आव्हान च ठरली आहे. याच दरम्यान , मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. 

राज्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याचदरम्यान आता राज्यशासनाने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे . जालना प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल देण्यावरील बंदी मागे घेतली आहे. 

खरीप हंगाम तोंडावर आला असताना राज्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे रखडली असून पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेत जालना प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल देण्यावरील बंदी अवघ्या दोन दिवसांत मागे घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

जालना प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल देण्यावरील बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर कृषी यंत्रांसाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध होणार आहे.


डिझेल खरेदीसाठी अटी

इंधनाचा गैरवापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर अटी लागू केल्या आहेत.

डिझेल घेण्यासाठी कागदपत्रे लागणार आहेत

अॅग्रीस्टॅक आयडी सादर करावा लागेल.

अॅग्रीस्टॅक नसल्यास स्वतंत्र नोंद वहीत माहिती नोंदवली जाणार

आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि स्वाक्षरी देणे अनिवार्य असणार आहे.

पेट्रोल पंप चालकांनी या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत.

गैरवापर केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group