NEET पेपरफुटीत नवा ट्विस्ट; स्पेशल बॅच आणि मोटेगावकर कनेक्शन चर्चेत
NEET पेपरफुटीत नवा ट्विस्ट; स्पेशल बॅच आणि मोटेगावकर कनेक्शन चर्चेत
img
Nandini khandare More


नीट पेपेपर फुटीप्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ निर्माण केली असून या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर  यांच्या  बद्दल आता एक नवीन खुलासा झाला आहे. आरोपी शिवराज मोटेगावकर  डॉक्टरांच्या मुलांसाठी  स्वतंत्र शिकवणी घेत होता. त्यामुळे आता हे डॉक्टर आणि त्यांचे पालक संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विशेष म्हणजे यातील काही डॉक्टरांची केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच ‘सीबीआय’ने चौकशी सुरू केली आहे.

 विशेष म्हणजे त्यासाठी शुल्क देखील स्वतंत्रपणे आकारण्यात येत होते. या तुकडीसाठी साधारणपणे चार ते पाच लाख रुपयांचा दर असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’मध्ये अवघे 145 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिमत विद्यापीठात प्रवेश दिला जातो. त्यासाठी 23-27 लाख रुपये मोजावे लागतात. मात्र, एवढी रक्कम त्यासाठी खर्च करण्यापेक्षा थेट प्रश्नपत्रिका मिळत असतील तर त्याच घेण्याकडे अनेकांचा कल होता, अशी चर्चा देखील लातूरमध्ये सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group