खुशखबर ! सरकारकडून पीएम घरकुल योजनेसाठी पैसे मंजूर!
खुशखबर ! सरकारकडून पीएम घरकुल योजनेसाठी पैसे मंजूर!
img
Nandini khandare More

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार  सरकारकडून पीएम घरकुल योजनेसाठी पैसे मंजूर झाले आहेत. म्हणून लाभार्थ्यांसाठी ही एक खुशखबर आहे. 

ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’  राबवली जात आहे. आजही अनेक ग्रामीण कुटुंबे कच्च्या घरांमध्ये, झोपड्यांमध्ये किंवा धोकादायक अवस्थेतील निवाऱ्यांमध्ये राहत असल्याने या योजनेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

अनेक लाभार्थ्यांचे घरकुलाचे हप्ते प्रलंबित असल्याने बांधकामे रखडली होती. मात्र आता शासनाने नवीन निधी वितरणाला मंजुरी दिल्याने थकीत हप्त्यांचा निधी लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून योजना राबवली जाते. विशेष म्हणजे, लाभार्थ्यांना मिळणारी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group