गेल्या दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धाचा तणाव संपूर्ण जगात पसरत आहे. याचदरम्यान आता पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर येत आहे. या माहितीनुसार अमेरिका पुन्हा एकदा इराण वर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. यामुळे पुन्हा एकदा जगभरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
वृत्तांनुसार, डोनाल्ड ट्रम्प प्रशासन इराणवर नवीन लष्करी हल्ल्यांची तयारी करत आहे. यादरम्यानच मोठा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घेण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचे लग्न आहे. मात्र, या लग्नाला डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार नाहीत. शिवाय आगामी सर्व दाैरेही रद्द करण्यात आलीत. अमेरिकेतील अधिकाऱ्यांचेही दाैरे रद्द करण्याचा मोठा निर्णय व्हाईट हाऊसने घेतला. ज्यामुळे पुढील काही तासात भयंकर घडण्याचे संकेत आहेत. गेल्या दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबापर्यंत हा संघर्ष येऊन पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीला टार्गेट करून हत्येचा कट रचण्यात आला. हा कट दुसरा तिसरा कोणीही नसून इराणच्या IRGC कडून रचण्यात आला.
डोनाल्ड ट्रम्प आता कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत बसणार नसल्याचे दिसतंय. अमेरिकेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. इराणवरील हल्ल्याबाबत अजून फायनल निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, परिस्थिती गंभीर आहे. सध्याची परिस्थिती बघता डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलाच्या लग्नात सहभागी न होण्याचे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प जर स्वत:च्या मुलाच्या लग्नात सहभागी होत नाहीत म्हणजे परिस्थिती किती जास्त गंभीर आहे, याचा अंदाजा येऊ शकतो.
याव्यतिरिक्त, त्यांनी मेमोरियल डेला न्यू जर्सीला जाण्याचा आपला बेतही रद्द केला. ते व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. संभावित परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या लष्करी आणि गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्यात. ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना सांगितले की, सध्या इराणचा मुद्दा हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाने स्पष्ट होते की, त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विषय संपून टाकायचा आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असले तरीही मागच्या काही वेळापासून अमेरिकेत घडामोडींना वेग आला. आता अमेरिका इराणविरोधात नक्की काय निर्णय घेते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, काहीतरी भयंकर घडणार असल्याचेही दिसत आहे.