इंधन दरवाढ आता सामान्यांचा खिशाला कात्री लावणारी ठरणारी आहे.आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेली इंधनवाढीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरात चारवेळा वाढ झाली आहे. सोमवारी देशभरात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्यानुसार आता पेट्रोलचे दर 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ झाली आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वात आधी वाढ झाली होती. त्यानंतर दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत गेले होते.
नाशिकमधील दर
पेट्रोल रु. ११२.४७
डिझेल रु .९९.११
>> आतापर्यंत वाढलेले दर
15 मे- पेट्रोल- 3 रुपये, डिझेल- 3.11 रुपये
19 मे- पेट्रोल- 87 पैसे, डिझेल- 90 पैसे
23 मे- पेट्रोल- 90 पैसे, डिझेल- 91 पैसे
25 मे- पेट्रोल- 2.61 रुपये, डिझेल 2.17 रुपये