राजकीय : शिंदे गटाचे 40 आमदार फुटणार? ''या'' बड्या नेत्याने केला मोठा दावा
राजकीय : शिंदे गटाचे 40 आमदार फुटणार? ''या'' बड्या नेत्याने केला मोठा दावा
img
Nandini khandare More

राज्यातील राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता एक मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एका बड्या नेत्याने शिवसेनेत (शिंदे गट)  मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. 

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना म्हटले की, ‘एकनाथ शिंदेंच्या पक्षातले आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. काही पक्षनिष्ठ आमदार सोडले तर अनेक आमदार संपर्कात आहेत. 2029 च्या निवडणुकांच्या आधी सगळं समोर येईल. जवळपास 40 च्या आसपास आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.’

रोहित पवार यांच्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता आगामी काळात पुन्हा राजकीय भूकंप पहायला तर मिळणार नाही ना असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत. कारण याआधीही राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलाढाली पहायला मिळाल्या होत्या, त्यामुळे रोहित पवार यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळाले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group