''या'' भाजप आमदाराची थेट अजितदादांच्या बंगल्यावर हजेरी, नेमकं काय घडतंय ?
''या'' भाजप आमदाराची थेट अजितदादांच्या बंगल्यावर हजेरी, नेमकं काय घडतंय ?
img
Nandini khandare More

विधानपरिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता एक मोठी बातमी समोर साली आहे. 
नांदेड विधानपरिषद मतदारसंघाची जागा आपल्याच पक्षाला मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी देवगिरी बंगल्यावर गर्दी करायला सुरुवात केली आहे. 

नांदेडमधील भाजपचे आमदार आणि माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी थेट देवगिरी बंगल्यावर हजेरी लावली. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन नांदेडच्या जागेबाबत सविस्तर चर्चा केली. नांदेड विधानपरिषदेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटली पाहिजे, अशी आग्रही भूमिका यावेळी चिखलीकरांनी या भेटीदरम्यान मांडल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहेत. प्रतापराव चिखलीकरांच्या या पवित्र्यामुळे महायुतीच्या अंतर्गत गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

नांदेडच्या राजकीय वर्तुळात अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यातील पारंपरिक संघर्ष सर्वश्रुत आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता विधानपरिषदेच्या या एका जागेवरून चिखलीकर आणि चव्हाण गट आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपकडून माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांचे समर्थकाच आघाडीवर असतानाच आता चिखलीकरांनी ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात नेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. चव्हाण यांच्या स्थानिक वर्चस्वाला शह देण्यासाठीच चिखलीकरांनी ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group