राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र आहे. रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र आहे. दरम्यान आत यावर काही तोडगा निघणार का अशा चर्चाना उधाण आले आहे. आता याचसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची महत्त्वाची बैठक बोलावल्याचे समोर आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होणार असून महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. प्रत्येक घटक पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी पडद्यामागे मोठ्या बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू आहे.
दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असून काही जागांवर अद्याप तिढा कायम असल्याची माहिती मिळत आहे. आता महायुतीतील हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महायुतीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या अपडेटनंतर सगळीकडेच आता महायुतीचा तिढा सुटणार, अशी चर्चा रंगली आहे.